You are currently viewing सोमवारपासून नविन शैक्षणिक वर्षांची सुरुवात

सोमवारपासून नविन शैक्षणिक वर्षांची सुरुवात

*सोमवारपासून नविन शैक्षणिक वर्षांची सुरुवात*

*पालकांना मिळणार पहिलीत दाखल विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलाचा ठसा*

*बांदा*

दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात १५मे रोजी होत असते पण यावर्षी रविवार आल्याने सन‌२०२५-२६या नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात चालू वर्षी १६जूनला होणार आहे.गेल्या दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा परिसरात असणारा शुकशुकाट विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून‌ जाणार आहे.शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थी, पालक व शिक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी काही मुले नव्याने शाळेत दाखल होणारी असतात आपल्या आईवडिलांना सोडून शाळेत राहावे लागणार या विचाराने चिमुकल्यांना अश्रू रोखता येत नाहीत त्यांची समजूत काढताना शिक्षकांना नाकी नऊ येते.गेले दीड महिने आपल्यापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांची चेहरे पाहून शिक्षकांना एक वेगळा आनंद मिळत असतो. विद्यार्थी हा शाळेकडे आकर्षला जावा यासाठी शाळा परिसराची साफसफाई करून पाने‌ ,फुले ,फुगे सडा, रांगोळी यांनी शाळा परिसर आकर्षक पुणे सजवला जातो. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शाळा विविध पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात .यामध्ये कोल्हापूरी फेटे बांधून ,झाडाचे रोप देऊन, पुष्पवृष्टी करुन बैलगाडीतून स्वागत अशा अनोख्या वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. पी एम श्री बांदा नं.१केंद्र शाळेच्या वतीने दरवर्षी पहिलीत नव्याने दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांना पहिले पाऊल म्हणून पायाचा ठसा उमटून दिला जातो.यावर्षी राज्यातील प्रत्येक शाळेत पहिलीत दाखल होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पहिल्या पायाचा ठसा उमटवून पालकांना दिला जाणार आहे. शाळेच्या या पहिल्या दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश बूट व मोजे यांचे वितरण करण्यात येणार आहे. चालू वर्षी अधिकिरी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व शिक्षणप्रेमी नागरीक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहेत. शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करून या दिवशी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात येणार आहे.या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद‌ ओसांडून वाहत असतो. नवीन पुस्तके ,वह्या, दप्तर ,रेनकोट, छत्री इत्यादी साहित्यासह मित्र मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये असते.

______________________________
*संवाद मीडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

दहावी बारावी नंतर काय करायचे!!…

घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

आजच प्रवेश निश्चित करा.

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567

कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा