You are currently viewing दोडामार्ग मांगेलीत दोन सख्ख्या भावांना लागलेल्या वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

दोडामार्ग मांगेलीत दोन सख्ख्या भावांना लागलेल्या वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

दोडामार्ग मांगेलीत दोन सख्ख्या भावांना लागलेल्या वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

दोडामार्ग

मांगेली- कुसगेवाडी येथील गवस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीजेचा धक्का लागून लहान भावाचा मृत्यू झाला असून मोठा भाऊ गंभीर जखमी आहे. नागेश पांडुरंग गवस (३५) असे मयत युवकाचे नाव असून मोठा भाऊ संदीप पांडुरंग गवस (४५) हा गंभीर जखमी आहे. त्यांच्या बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघांनाही स्थानिकांनी उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नागेश याला मयत घोषित केले. संदीप यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेने दोडामार्ग तालुका हादरला आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप करीत स्थानिक आक्रमक झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा