You are currently viewing त्‍या वाहन चालकांना मतदान करण्याची व्यवस्था करा…

त्‍या वाहन चालकांना मतदान करण्याची व्यवस्था करा…

त्‍या वाहन चालकांना मतदान करण्याची व्यवस्था करा…

कणकवली भाजपची मागणी ; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन…

कणकवली

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे पोचविणे तसेच अन्य सोई सुविधांसाठी भाडे तत्‍वावर वाहने घेण्यात आली. या वाहनांवरील वाहन चालक मतदानापासून वंचित राहिले. त्‍यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी अशी मागणी कणकवली भाजपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना देण्यात आले.
भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे जिल्‍हाध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर आदींनी आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले. यात म्‍हटले आहे की, लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी अनेक वाहने भाड्याने घेण्यात आली. या वाहनांवरील वाहन चालक मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या आदल्‍या दिवसापासून मतदान यंत्रे मुख्यालयात पोच होईपर्यंत कार्यरत होते. त्‍यामुळे या वाहन चालकांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता आले नाही. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान झाले असले तरी मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी सुरू होणार आहे. त्‍यापूर्वी या वाहन चालकांना मतदान करता यावे यासाठी प्रक्रिया राबविण्यात यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा