मालवणात उद्या सुतार समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन
मालवण
मालवण तालुक्यातील सुतार समाज बांधवांचा मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार दि. १५ जून रोजी सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय मालवण येथे आयोजित केला आहे.
या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर पुणे, राज्य समन्वयक दिलीपराव आकोटकर, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा क्रांतीदल अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, जगप्रसिद्ध शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ, कोकण विभागीय समन्वयक आनंद मेस्त्री सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यात. संत भोजलींगकाका सुतार आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी समस्त मालवण तालुका सुतार समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.


