You are currently viewing महिलांतर्फे जागतिक पर्यावरण दिन आणि एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण संपन्न

महिलांतर्फे जागतिक पर्यावरण दिन आणि एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण संपन्न

बिजलीनगर, चिंचवड-

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पूर्ण भारतभरामध्ये 75 हजार वृक्षारोपण केलेल्या संकल्पपूर्ती व “व्हय मी सावित्रीबाई बोलते” या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

उत्तर भारतीय गुरु अमर संयम अमृत वर्ष यांच्या 75 व्या संयमी दीक्षा महोत्सवा निमित्त व दक्षिण सूर्य ललित लेखक प.पू. डॉ वरून मूनिजि म. सा. यांच्या 25 वी जयंती रजत दीक्षा महोत्सवा निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम बिजलीनगर ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

स्वानंद महिला संस्था व ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखा नवी दिल्ली यांच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एक झाड अमरमुनी के नाम या घोषणा देत महिलांनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करतेवेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका शारदाताई मुंडे, सौ. सुजाता चोरडिया, सौ. नीता जैन, सौ. सुनीता कांकरिया व ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या पंचमझोन अध्यक्षा कल्पना कर्नावट, महामंत्री सुनिता चोरडिया तसेच स्वानंद अध्यक्ष शोभा बंब, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासाठी सतर्क राहण्याचा संदेश गुरु अमरमुनींच्या संयम यात्रे निमित्त लेखक वरून मुनी जी यांच्या संयमी दीक्षा निमित्त त्यांनी पर्यावरणाचा, पर्यावरण राखण्याचा संदेश उपस्थित महिलांना दिला.

“व्हय मी सावित्रीबाई बोलतेय” या एकपात्री कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सुरेखा कटारिया यांनी आपल्या आम्ही सावित्री च्या लेकी सुना या सामाजिक आशयाच्या कवितेने केली.

एकपात्री प्रयोग सादर करणाऱ्या समाजसेविका शारदा ताई मुंडे यांची मुलाखत कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड यांनी घेतली. त्यामध्ये त्या या सावित्रीचा वसा कसा पुढे चालवला याचा उंचावत गेलेला आलेख त्यांनी मुलाखतीतून सादर केला. त्यामुळे महिलांना एक प्रेरणा मिळाली.

प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष शोभा बंब यांनी स्वानंद महिला संस्थेचा 25 वर्षाचा लेखाजोखा मांडला. स्वानंद सखी मनोगत सुप्रिया सोळंकुरे यांनी स्वानंद साहित्य भिशीच्या उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव सीमा गांधी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये कल्पना बंब यांनी आपली कविता सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका विजयश्री मेहता यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा