*ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील आदर्श शिक्षिका सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय*
(अहिराणी बोलीभाषेतील कविता)
माय तुझी याद
मनभरीसन वाहस
तुझ्यावाचून हाइ जीनं
सुनं सुनंचं रहास
कितलं समाय माले
कसं वाढावं माले
स्वतः सोसिसन उन्हाया
दिना गारवा माले
मनासाठे चाले तुनी
वनवन दिनरात
दुख मनमा ठीसन
सुखे दारमा पेरात
जशी पक्षिन आभायमा
जशी गाय रानमा
तशी भटकनी माय तू
खेत मया वावरमा
काटाकुटा खड्डाखुड्डा
तुडावत तू ऊनी
गानं गोड म्हने तू
डोया पुशीसनी
माय तुना कष्टामातून
सपन साकारनं
डौलदार झाड तसं
जीवन मनं आकारनं
अनुपमा जाधव
