*वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण*
निगडी
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग व निसर्ग मित्र विभागाने निगडी येथील संत कबीर उद्यानात वटपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी महिला विभाग अध्यक्षा अनघा कानडे, कार्याध्यक्ष अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्ष वैदेही पटवर्धन, आदि उपस्थित होते.
यानंतर महिलांनी लावलेल्या याच वडाच्या झाडाची नेहा साठ्ये यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. विश्व हिंदु परिषद, मातृशक्तीच्या प. महाराष्ट्र प्रांत सत्संग प्रमुख शारदा रिकामे यांनी पौराहित्य केले.
माजी नगरसेविका शर्मिला बाबर, मानसी म्हस्के, उन्नती वैद्य, समृद्धी पैठणकर, सुखदा भौन्सुले, मुक्ता चैतन्य, वैशाली जोशी, मधुरा कुलकर्णी, पल्लवी कोंडेकर, संपदा पटवर्धन, उज्ज्वला जाधव, माया सावंत, शांता बाजबळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांनी वटपूजनात सहभाग घेतला.
निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी ते म्हणाले “निसर्ग साखळी मध्ये वडाच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वडाच्या झाडापासून सर्वात जास्त प्राणवायू मिळतो, म्हणून पुजेच्या निमित्ताने, वडाला प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने जास्तीत जास्त वेळ वडाच्या झाडाच्या सानिध्यात घालवायला हवा. तसेच पुजेसाठी बाजारातून वडाच्या फांद्या आणून पूजा केल्याने लाभ न होता झाडांची कत्तल होत असल्याने याबाबत महिलांनीच जनजागृती करावी.”
सौ. वैदेही पटवर्धन यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.
निसर्ग मित्र विभागाचे सचिव विजय सातपुते व दिपक नलावडे यांनी संयोजन केले.
भास्कर रिकामे – 9028546415
______________________________
*संवाद मीडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
दहावी बारावी नंतर काय करायचे!!…
घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
आजच प्रवेश निश्चित करा.
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567
कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

