You are currently viewing Delhi Blast; राजधानीत स्पोटाने माजवली खळबळ

Delhi Blast; राजधानीत स्पोटाने माजवली खळबळ

 

चालत्या कारमधून संशयितांनी इस्रायली दूतावासासमोर एक पॅकेट फेकलं आणि…

कमी तीव्रतेच्या या स्फोटाच्या माध्यमातून फक्त नागरिकांमध्ये भीती निर्माण करणं हाच हेतू असल्याची माहिती सुरुवातीच्या तपासातून समोर येत आहे.

Dilhi Blast देशाच्या राजधानीत शुक्रवारी एका स्फोटानं खळबळ माजवली आहे. दिल्लीत अतिसंवेदनशील भागामध्ये इस्रायली दूतावास असणाऱ्या परिसरात कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट झाला. ज्यानंतर तपास यंत्रणांनी या घटनेची सूत्र नेमकी कुठं जोडली आहेत याचा तपास सुरु केला. यातूनच आता कथित आरोपींची रेखाचित्र तयार करण्यास सुरुवात झाली आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाच्या संरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळं दिल्ली पोलिसांच्या आव्हानांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दिल्ली अतिसंवेदनशील भागांपैकी एक असणाऱ्या क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटामुळं पुन्हा एकदा संरक्षणव्यवस्थेवरील ताण वाढवला आहे. हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा घटनास्थळापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर बिटींग द रिट्रीटचा कार्यक्रम सुरु होता. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी इथल्या संपूर्ण परिसराची आणि कानाकोपऱ्याची तपासणी करण्यात आली होती, तरीही सदर घटना घडली.

सध्या हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासातून इस्रायलच्या दूतावासापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर एका चालत्या कारमधून एक पॅकेट बाहेर फेकण्यात आलं होतं. ज्यानंतर या पॅकेटचा स्फोट झाला. प्राथमिक स्तरावरील माहितीनुसार स्फोटकांच्या बाजारात मिळणाऱ्या काही गोष्टी एकवटत हा बॉम्ब तयार करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर सध्या संशयितांची रेखाचित्र तयार करण्यात येत आहेत. या कारचा क्रमांक शोधण्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचाही या तपासादरम्यान आधार घेण्यात येणार आहे. अद्यापही या घटनेमध्ये कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं वारंवार गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून मिळणारा सतर्कतेचा इशारा आणि त्यानंतर घडलेली ही घटना पाहता राजधानी आणि संपूर्ण देशातच सावधगिरीची पावलं उचलली जाऊ लागली आहेत.

स्फोटामागचा हेतू काय?

कमी तीव्रतेच्या या स्फोटाच्या माध्यमातून फक्त नागरिकांमध्ये भीती निर्माण करणं हाच हेतू असल्याची माहिती सुरुवातीच्या तपासातून समोर येत आहे. असं असलं तरीही पुन्हा एकदा अतिसंवेदनशील भागांच्या सुरक्षा व्यवस्थांमध्ये असणाऱ्या तृटी पुन्हा एकदा लक्ष वेधून गेल्या आहेत. शिवाय यामुळं काही गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा