You are currently viewing समुद्रसंगीत

समुद्रसंगीत

*ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*समुद्रसंगीत*

 

 

लाटेमागून लाट उसळते

किनाऱ्यावर अलगद आदळते

फुटते

थेंबांची होते उधळण

हे तर समुद्राचे नर्तन

आणि दिव्य ते

गर्जत गायन

 

 

अनंत आभाळाखाली

सुरुच असते ही

सागराची

अथांग मैफल

 

 

किती बघावी

किती ऐकावी

किती साठवावी

डोळ्यात

 

 

किनाऱ्यावर प्रेक्षक येतील

जुने जातील

नवे येतील

नवे जुने होतील

 

 

समुद्रसंगीत

सुरुच राहील

अहोरात्र

अखंड

 

 

अनुपमा जाधव, डहाणू

प्रतिक्रिया व्यक्त करा