You are currently viewing किती करावे ढोंग माणसा…

किती करावे ढोंग माणसा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*किती करावे ढोंग माणसा…*

 

किती करावे ढोंग माणसा माहित आहे

पाणी किती ते उथळ तुझे रे माहित आहे…

 

सभ्यपणाचा बुरखा तुझा रे लक्तरेच ती

किती उसवला तुझा तुला रे माहित आहे..

 

खळखळाटच फार तुझा रे उथळ तू फारच

मासा गळाला कसा लावावा माहित आहे…

 

कोडगाच तू उजळ माथ्याने वावरतांना

लाज मुळी ना तुला वाटते माहित आहे…

 

तिकडून इकडे इकडून तिकडे बोट तू लावी

शाईच नाही तुझ्या लेखणीत माहित आहे..

 

का रे खटपट करतो इतकी लोचट इतका

झाला विचका पुरता तरीही मिरवत आहे..

 

देव घडवितो असे नमुने करमणुकीस्तव

चेंडू सारखा इकडून तिकडे फटके खाई..

 

किव वाटली तरीही आपण करू न शकतो

सुधरण्याची सुतराम शक्यता यांची नाही..

 

दोन घटका करमणूक अन् हसण्यासाठी

जमात कोडगी मन रमविण्या झटत राही..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा