You are currently viewing अखेर ” ती ” गटारखुदाई बुजविण्याची हायवे ठेकेदारावर नामुष्की

अखेर ” ती ” गटारखुदाई बुजविण्याची हायवे ठेकेदारावर नामुष्की

नगराध्यक्ष नलावडे यांच्या दक्षतेचे शहरवासीयांत कौतुक –

कणकवली

आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित न होताच गटार खुदाई करणारा हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन तोंडघशी पडला आहे. खोदलेले गटार बुजविण्याची नामुष्की दिलीप बिल्डकॉनवर ओढवली आहे.
कणकवली शहरात सर्व्हिस रोडसह ४५ मीटर हायवे आहे. मात्र पटवर्धनb चौकात लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स समोर आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित न करताच गटार खुदाई चे काम हायवे ठेकदाराने सुरू केले होते. त्याला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि सहकारी नगरसेवकांनी आक्षेप घेत आधी आरओडब्ल्यू लाईन …नंतर गटार काम करा अशी सडेतोड भूमिका घेतली होती. त्यानुसार मोजणी झाल्यानंतर आर ओ डब्ल्यू लाईन च्या आत गटार खुदाई झाल्याचे निष्पन्न झाले. ट्राफिक ची वर्दळ असणाऱ्या पटवर्धन चौकात यामुळे सर्व्हिस रोड ची रुंदी कमी होणार होती. नगरपंचायत च्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकणेही कठीण होणार होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे ठेकेदाराचा नागरिकांची गैरसोय करून आपले काम उरकून घेण्याचा डाव उधळला आहे. नगराध्यक्ष नलावडे यांच्या दक्षतेने कणकवली वासीयांच्या भविष्यातील पिढ्यानपिढ्यांना होणारा त्रास वाचल्याबद्दल शहरवासीय नलावडे यांचे कौतुक करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा