You are currently viewing लपाछपीची गरज….माझ्या शब्दांना

लपाछपीची गरज….माझ्या शब्दांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लपाछपीची गरज….माझ्या शब्दांना*

 

शब्दांच्या अल्याडपल्याड.. मी

नात्यांची वीण जपली

स्वच्छ मनाच्या शब्दांशी

खुजी..खडाजंगी केली…

 

निगर्वी संवेदनशील शब्दांना

लपाछपीची गरज भासली

बाहुबली उच्छाद माझा

शिव्यांची लाखोली वाहीली..

 

अनादी मुक्या शब्दांनी

गळा माझा धरला

तुझा गळा..माझा गळा..मीचं

फेक नॅरेटिव्ह पसरवला..

 

सौजन्य सभ्यपणाचं दाखवत

मिटवला ..शब्दांशी वाद

हुक्की.. प्रतिभा निर्मितीची

जीवघेणा ..शब्दांचा नाद…

 

गोष्ट शब्द पेरण्यांची

ध्वनीचं… ऐकत राहिला

निदर्शक..युध्दखोर शब्द

समूहमनाचा अंतर्नाद बहकला…

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा