You are currently viewing आखवणे – भोम नागपवाडी पुनर्वसन गावाठाणला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर

आखवणे – भोम नागपवाडी पुनर्वसन गावाठाणला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर

आखवणे – भोम नागपवाडी पुनर्वसन गावाठाणला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

वैभववाडी

आखवणे भोम नागपवाडी ( पुनर्वसन गावठाण) या महसुली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली आहे. धरणग्रस्थांच्या मागणीला यश आले आहे. महसुली गावाच्या दर्जानंतर गावाठाणाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे धरणग्रस्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांनामुळेच गावाठाणाला एवढ्या लवकर ग्रामपंचायत मंजूर झाल्याबद्दल आखवणे – भोम पुनर्वसन गावाठाणातील धरणग्रस्थांकडून पालकमंत्र्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत. अरुणा मध्यम पाटबंधारे धरण प्रकल्पात आखवणे, भोम नागपवाडी ही गावे धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली आहेत. या प्रकल्पातील धरणग्रस्तांचे मांगवली, कुसुर, उंबर्डे या गावच्या हद्दीत पुनर्वसन गावठाण तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी सन 2019 साली विस्थापित धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेव्हापासून या पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी अशी मागणी धरणग्रस्थांकडून करण्यात येते होती. दरम्यानच्या काळात या पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला. त्यानंतर या महसुली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करावी. अशी मागणी धरणग्रस्तांकडून लावून धरण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे दिनांक 6 मे 2025 पासून नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आल्या बाबतची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या तीन चे कलम चार द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. सदरची अधिसूचना आपल्या स्तरावरून गटातील आखवणे, भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाणसाठी देण्यात यावी. तसेच तहसीलदार कार्यालय वैभववाडी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडील पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात यावे. असे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी यांना पत्राद्वारे कळविले आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आखवणे, भोम, अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती यांच्याकडून गेली सहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. ग्रामपंचायत प्रस्ताव अनेक वेळा त्रुटी काढून मागे आला. त्या त्या त्रुटीची पूर्तता करून प्रस्ताव परत सादर करण्यात आला. तालुका पातळीपासून अगदी मंत्रालयापर्यंत अगदी टेबल टू टेबल पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. यासाठी उपसरपंच आकाराम नागप, अभय कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना माजी सरपंच आर्या कांबळे, डॉ. जगन्नाथ जामदार, दत्ताराम नागप, रंगनाथ नागप, सुभाष नागप, संतोष नागप, सुरेश पांचाळ यांच्यासह आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्थानी खंबीर साथ दिली. तर पालकांमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे धरणग्रस्थांकडून पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा