छत्रपती शिवराज्याभिषेक दिन
सिंधुदुर्गनगरी
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 6 जून रोजी पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे ‘छत्रपती शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात येणार आहे. तरी संस्थेतून उत्तीर्ण झालेले तसेच रोजगार व स्वयंरोजगार करणारे या संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी केले आहे.
या कार्यक्रमानिमित्त संस्थेमध्ये निमंत्रित करण्यात आलेल्या प्रमुख व्याख्यांतामार्फत ‘सामाजिक समरसता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे, व्याख्याते तसेच जिल्ह्यातील लोकप्रिनिधींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

