माडखोल धरणात काल सेल्फी काढताना मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यूची घटना ऐकून हृदयाच्या धक्क्याने आज बापाने ही गमावला जीव
सावंतवाडी
सावंतवाडी शहरांमध्ये एक दुर्दैव घटना घडली क्रिश संभया वय वर्ष 18 हा मुलगा काल संध्याकाळी माडखोल धरणामध्ये सेल्फी काढताना बुडून मृत्यू पावला ही बातमी समजतात त्याचे वडील सेव्हिओ संभया वय 48 यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला कारण तो त्यांचा आवडता मुलगा होता आणि त्याच धक्क्याने आज सकाळी त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सकाळी सहा वाजता तातडीने दाखल केले. त्याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी तातडीने आरोग्य यंत्रणे हलवली असता ऑन कॉल तत्वावर ड्युटी बजावत असलेले डॉक्टर चितारी काही मिनिटातच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व सर्व पद्धतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु उपचाराच्या दरम्यानच त्यांच आज दुपारी बारा वाजता येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले ही बातमी ऐकताच त्यांचा परिवार व मित्रमंडळी व सावंतवाडी शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

