*ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गाभारा*
करी कोणी चोरी मारी
कोणी मागतसे भीक
सुपीक भूमित
साबराचे पीक
कोणी ओरबाडी वेली
कोणी झाडांना कापतो
गंध सारा तुडवून
कोणी सावल्या जाळतो
असे घडतेच कसे
कोणी का न घेई शोध !
कोणी संताने येऊनि
द्यावा मानसाला बोध
एक भला ज्ञानमार्ग
जो जाळीतो अंधारा
त्याने सरते पशूता
भरे मनाचा गाभारा
अनुपमा जाधव, डहाणू
