पुणे : आदरणीय बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सातव्या विश्वबंधुता काव्यसंमेलनात एस. एम. जोशी सभागृह पुणे येथे आदरणीय प्रकाशजी रोकडे, जेष्ठ साहित्यिक चंद्रकात वानखेडे गझलकार, संमेलनाध्यक्ष सिराज सिकलगार, प्रा. सुभाष वारे, प्रा.भारती जाधव, प्राचार्य अरूण आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ साहित्य पुरस्कार, रमाई साहित्य पुरस्कार, मायमराठी पुरस्कार आणि पल्लवी उमरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, सन्मानचिन्ह, तिरंगा महावस्त्र, प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या चंद्रप्रिया या काव्यसंग्रहाचे आणि सिराज सिकलगार यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.
