You are currently viewing अणसूर ग्रामपंचायत तर्फे गावात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सन्मान…

अणसूर ग्रामपंचायत तर्फे गावात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सन्मान…

अणसूर ग्रामपंचायत तर्फे गावात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सन्मान…

वेंगुर्ले

अणसूर ग्रामपंचायत येथे पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी करून गावातील समाजात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आले.

प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिक अंगणवाडी सेवा निवृत कर्मचारी श्रीमती शशिकला भालचंद्र गावडे यांच्या हस्ते हार घालून पूजन करुन अभिवादन केले त्यानंतर अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख रुपये पाचशे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जेष्ठ नागरिक सेवा निवृत शशिकला भालचंद्र गावडे, अनुष्का अंकुश तेंडोलकर, विनया विश्वनाथ गावडे यांचा समावेश होता. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ, महिला वर्ग, भाजप पदाधिकारी आनंद (बिटू) गावडे. शक्ती केंद्र प्रमुख, गणेश मनोहर गावडे, बूथ प्रमुख, वामन लक्षिमण गावडे, ग्रामअधिकारी श्रीमती सायली सातोसे, उपसरपंच, वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, वामन गावडे, पदाधिकारी देऊ गावडे, प्रकाश गावडे,

शिला देवूलकर, स्वरांजली गावडे, रुचिता गावडे, अनिषा गावडे, अन्नपूर्णा गावडे, भक्ती गावडे, सायली गावडे, बहुसंख्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा