You are currently viewing हाय हॅलो

हाय हॅलो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लावणी*

 

*हाय हॅलो*

यती—७ वर्ण १५

 

 

सुसाट वा-यासम, पळवी बुलेट गाडी

हाय हॅलो रोजचं, हायफाय वाटे गडी ||धृ||

 

मीही त्याला कधीच, घालीत नाही हो भीक!

मरू दे माझ्यावर,कैक हे प्रेमपाईक

 

लाखात देखणी मी, आहे नार गुलछडी

हाय हॅलो रोजचं, हायफाय वाटे गडी||१||

 

घडी चेन कपडे, दावी विलायती थाट?

भुलायची नाही रे,बनलास माझा भाट

गुलबकावली मी, अप्राप्य जादूची छडी

हाय हॅलो रोजचं, हायफाय वाटे गडी||२||

 

फाडफाड इंग्लीश, बोले ,मारी इंप्रेशन!

त्याला का द्यावे सांगा? मी स्पेशल कन्सेशन?

मी मॉडेल मॉडर्न,आहे मी ही फटाकडी

हाय हॅलो रोजचं,हा हायफाय वाटे गडी||३||

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा