सावंतवाडीत कामगार कल्याणच्या वतीने उद्या मोत्यांचे दागिने बनविण्याचे प्रशिक्षण…
सावंतवाडी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी येथे उद्या मोत्यांचे दागिने बनविण्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना मैदान येथील कामगार कल्याण केंद्रात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी केंद्रप्रमुख सौ. नम्रता आराबेकर (९४२१२६४८००) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुकांनी लवकरात-लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

