You are currently viewing योग म्हणजे सुयोग

योग म्हणजे सुयोग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*योग म्हणजे सुयोग…*

 

योग म्हणजे सुयोग असतो जीवनास घडवितो

संतुलन ते आयुष्याचे दुर्गुणास पळवितो..

 

सुदृढ होते शरीर मन नि विकार सारे पळती

योगासंगे षड्रिपू ते सारे जळून जाती…

 

कितीतरी ते योगी असती हिमालयी अजूनी

करती साधना सिद्धहस्त ते आयु झालीसे जुनी..

 

योग साधना करता जीवीत होते संतुलित

स्थिरावते मन बुद्धी होते पूर्णच द्वेषातीत..

 

नारायण तो येतो जवळी स्वर्गद्वार उघडते

प्रेमभावच उरतो फक्त जग ही सुंदर दिसते..

 

योग्यांचे ते जग वेगळे आहे म्हणती हिमालयात

ठायी ठायी गुलाब पुष्पे म्हणे तिथे फुलतात..

 

चिरंजीव ते योगी असती हिमालयी वसती

कठोर आहे खूप परीक्षा खूप न जाऊ शकती…

 

सत्वपरीक्षा पास होऊनी जातो एखादाच

गूढ आहे दुनिया तेथील कधी न येते आंच…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा