You are currently viewing झाशीची शूरवीर झलकारी

झाशीची शूरवीर झलकारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*झाशीची शूरवीर*

          *झलकारी*

 

राणीसाहेब, आपला माझ्यावर विश्वास नाही का? माझ्या स्वामी निष्टेबद्दल आपल्या मनात काही शंका तर नाही?

अतिशय काकुळतीने विचारलेल्या या प्रश्नाने राणी लक्ष्मीबाई गहिवरल्या झलकारीचे दोन्ही हात आपल्या हातात घेत त्या म्हणाल्या? ए वेडाबाई, अशी शंका तरी कशी येते तुझ्या मनात? तुझ्या काळजीपोटी च म्हणत होते मी! मान्य आहे मला की माझ्यासारखी तुझी वेशभूषा पाहून इंग्रज सैनिक फसतील तुला मीच समजतील व मी स्वतः किल्ल्यावरून निघून दूर सुरक्षित ठिकाणी पोहचू शकेन! अस करणं मला नाही बरोबर वाटत! पण झलकारी काहीएक ऐकायला तयार नव्हती! कोण होती ही झलकारी? राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील पुरन कोरी ची पत्नी होती ती! उत्तर प्रदेशातील एका खेड्यात २२नोव्हेंबर १८३० मध्ये तिचा जन्म झाला ! बालपणापासूनच ती अतिशय धीट होती इतर मुलींसारखे बाहुलाबाहुलीचे लग्न व लुटुपुटीचा स्वयंपाक यात तिचे मन कधीच रमले नाही आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी धडपडण्याची तिची प्रबळ इच्छा असे झलकारीने घोडेस्वारी तलवारबाजी व युध्द कलेत नैपुण्य मिळविले होते पुरन कोरीशी लग्न झाल्यावर तिला आपली इच्छा पूर्ण होणार अशी आशा वाटू लागली व तिची शौर्य कथा ऐकून प्रभावित झालेल्या राणी लक्ष्मीबाई ने तिला आपल्या सैन्यात सामील करून घेतले विशेष म्हणजे ती दिसायला बरीचशी राणीसारखीच होती व त्यांच्यासारखा वेष परिधान केल्यावर तर ती साक्षात राणी लक्ष्मीबाई च वाटे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात तिने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहेत्यामुळे लोक तिला अभिमानाने झाशीची शूरवीर या नावाने ओळखतात प्रत्यक्ष ब्रिटिश जनरल ह्यू रोजने तिची स्वामिनिष्ठा, हिंमत शूरतेचे कौतुक केले आहे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी राणीने किल्याबाहेर दूर निघून जाणे अत्यावश्यक होते झलकारी हट्ट धरून बसली की मी तुमचा वेष परिधान करून शत्रूला झुलवत ठेवीन तुम्ही तोपर्यंत हुल देऊन सुरक्षित ठिकाणी पोहचू शकाल! परंतु आपल्या सुरक्षेसाठी आपल्या सैन्यातील वीरबालेचा असा बळी घेणे राणीला आवडत नव्हते तिच्या शौर्याने प्रभावित होऊन राणीने तिला दुर्गादल या महिला सैन्यात जवाबदरीचे काम दिलेले होते शेवटी तिचा हट्ट राणीला पूर्ण करावाच लागला राणीसारखी वेषभूषा करून झलकारी किल्याबाहेर आली ब्रिटिश सैनिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले तिची वेशभूषा पाहून ब्रिटिश सैन्य भुलले तिलाच राणी समजून ते तिचा पाठलाग करू लागले अतिशय हिमतीने ती त्यांना चकवीत विरुद्ध दिशेला नेत राहिली त्यामुळे राणी लक्ष्मीबाई सुखरूपपणे किल्याबाहेर पडल्या झलकारीने अतिशय नेटाने शत्रूपक्षाला थोपवून ठेवले होते शत्रूला हुलकावणीव देत तिने त्यांना किल्ल्यापासून बरेच दूर नेले तोपर्यंत राणीसाहेबांना किल्ल्याबाहेर सुरक्षितपणे निघून जाण्याची संधी मिळाली तिला वीरमरण प्राप्त झाले अतिशय मोलाची कामगिरी करणारी ही वीरांगना स्त्रीशक्ती व देशप्रेमाचा

अभूतपूर्व आदर्श आहे यात संशय नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या हिरकणीचे उत्तर प्रदेशात असलेले पुतळे तिच्या शौर्याची आजही साक्ष देतात तिच्या नावाने उत्तर प्रदेश सरकारच्या अनेक योजनादेखील आहेत अशी ही झाशीची शूरवीर झलकारी! तिच्या कर्तृत्वाने शौर्याने व इतिहासात अजरामर झाली

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा