You are currently viewing चौके ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

चौके ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

मालवण :

चौके ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार्‍या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी चौके गावातील श्रीम. प्राची प्रशांत कुबल व श्रीम. विशाखा विजय पार्टे यांची निवड करण्यात आली.या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवार या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी चौके ग्राम पंचायत सरपंच पी.के.चौकेकर यांच्या अध्यक्षेतेखाली चौके ग्राम पंचायत कार्यालयामध्ये संपन्र झाला.यावेळी मालवण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल चौके आशा स्वयंसेविका सौ.सिध्द्दाली गावडे यांचा सत्कार यावेळी चौके ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आला.यावेळी सुरुवातीला अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मीरा सावंत याच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चौके हायस्कुलमधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या निहारिका महेश सावंत,समिक्षा धोंडी सडवेलकर व श्रीयन सतेज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पी.के चौकेकर,मीरा सावंत,विजय चौकेकर,संतोष गावडे,नितिन गावडे, सिद्धाली गावडे,प्राची कुबल,विशाखा पार्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्राम पंचायत सदस्य,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ,अगंणवाडी सेविका,मद्दतनिशी,बचट गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविधा सावंत व आभार मेघा वराडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा