You are currently viewing नूतन अधीक्षक अभियंता महावितरण सिंधुदुर्ग यांची सोमवारी भेट घेणार जिल्हा वीज ग्राहक संघटना

नूतन अधीक्षक अभियंता महावितरण सिंधुदुर्ग यांची सोमवारी भेट घेणार जिल्हा वीज ग्राहक संघटना

*नूतन अधीक्षक अभियंता महावितरण सिंधुदुर्ग यांची सोमवारी भेट घेणार जिल्हा वीज ग्राहक संघटना*

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसातील विविध वीज समस्यांनी हैराण झाले असून महावितरणच्या वीज सेवांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंता साळुंखे यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंता पदी श्री अभिमन्यू राख यांची नियुक्त होऊन त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. जिल्ह्यातील वीज समस्या बाबत तत्कालीन अधीक्षक अभियंता यांना माहिती होती, परंतु अल्पावधीतच त्यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंत्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील वीज समस्या त्यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून येत्या पावसाळ्यात जिल्हा अंधारात राहू नये. यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वीज ग्राहक सोमवार दिनांक ०२ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या आठ दहा दिवसांपासून अवकाळी पावसात अंधारात चाचपडत आहे. जिल्ह्यात शून्य वीज चोरी, वीज थकबाकी अशा समस्या नसतानाही वीज ग्राहकांना चार चार दिवस अंधारात राहण्याची वेळ येते. सावंतवाडी सारख्या शहरात देखील ७८ तास वीज पुरवठा खंडित होता. आजही शहरात दिवसातून पाच ते दहावेळा तर तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच परिस्थिती दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आदी तालुक्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज समस्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच जिल्ह्यातील वीज समस्यांनी प्रभावित असलेल्या वीज ग्राहकांनी, गावागावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी आपापल्या गावातील वीज समस्या लेखी स्वरूपात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत पैकी कोणत्याही गावात ज्या ज्या ठिकाणी नवीन सब स्टेशन, नवीन फिडर, नवीन रोहित्रे, नवीन पोल, नवीन वायर, नवीन केबल, रेग्युलर जुन्या पद्धतीचे मीटर ( स्मार्ट मीटर नको ) तसेच भूमिगत केबल लाईन आवश्यक असल्यास त्याची सविस्तर यादी आणि तपशील मागणी पत्रासहित न विसरता सोबत घेऊन कुडाळ येथे उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

👨‍⚕👩‍⚕👩‍💻👩‍🎓👨‍🎓👨‍⚕👩‍⚕👩‍💻👩‍🎓👨‍🎓

_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_

🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/

_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_

▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_

_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_

▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_

_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_

▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_

_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_

_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_

🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_

_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._

🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_

🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_

🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_

🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_

🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_

🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_

_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/

https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा