You are currently viewing ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

————————————–

श्री स्वामी समर्थ नाम । आहे पावन हो नाम । नित्य घ्यावे

नाम । मिळे समाधान ।। १ ।।

 

हरीचा आठव अंतरी । जो नित्य करी । स्मरण श्री गुरूंचे करी । भक्त असती प्रिय समर्थांसी ।। २ ।।

 

भ्रमाणगाथा समर्थांची । शब्दरूपात साची । महती समर्थ कार्याची घ्यावी जाणुनी ।।३ ।।

गुजरात, सौराष्ट्र, कच्छ भागातले एक क्षेत्र । असे एक त्रिविक्रम देवालय क्षेत्र । नारायण तलाव पवित्र ।

ख्यात असे सर्वत्र ।। ४ ।।

 

प्रमुख इथला महंत होता । ताफा शिष्यांचा मोठा हा महंत

बाळगून होता । पैसे बळजबरीने वसुली करता । यात्रेकरूकडून ।।५ ।।

 

महंताचा असा अन्यायी कारभार । यात्रेकरूंना होई त्रास फार । महंतांचे वागणे भयंकर । यात्रेकरूंच्या सोबत ।।६।।

 

त्रिकालज्ञानी स्वामींना हे सारे लक्षात आले । त्यांचे येणे

या क्षेत्री झाले । नारायण तलावाकाठी आले । श्री स्वामी समर्थ ।।७ ।।

 

मध्यभागी तलावाच्या गेले । जलपृष्ठावरी जाऊन बसले ।

महंत शिष्यांना योग सामर्थ्य दाविले । थक्क झालेल्या

शिष्याने महंतास वृत्त सांगितले ।।८ ।।

 

महंत त्वरे स्वामी दर्शना आला ।म्हणे, आलो मी शरण तुम्हाला । आम्ही छळ सर्वांचा केला। घोर अपराध आम्ही केला ।।९ ।।

 

महंत आता बदलला । स्वामींना प्रत्यय आला । न्याय नीती

शुद्ध आचरणाचा धडा त्यासी दिला । स्वामींनी ।।१० ।।

************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

—————————————-

कवी-अरुणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा