*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सखा*
तूच सखा,तूच सोबती
तूच माझा सहारा जीवाचा
तुझ्याच ठायी
शोधत असते मी
अंश शिवाचा
तुझे शब्द होतात
माझ्यासाठी फुले
तुझ्यामुळेच माझे
गगन होते खुले
तुझ्या सहवासात
हरपते भान
विसरते भूख
विसरते तहान
चांदव्याच्या परी
तू शांत नि शितल
जणू वाहणारा
झरा झुळझुळ
तुझ्या प्रेमामध्ये
शक्ती आहे मोठी
गगणभराऱ्या
घेईन मी कोटी
अनुपमा जाधव, डहाणू

