शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन…
वेंगुर्ला : केरवाडा येथील शिरोडा मच्छिमार सहकारी सोसायटीची १२ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलने १२ ही जागा जिंकून एकहाती विजय मिळवला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले.
केरवाडा येथील शिरोडा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १२ जागांसाठी उमेदवार रिंगणात होते. यात मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलने १२ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात ३ जागा या बिनविरोध निवडून आल्या तर ९ जागांसाठी मतदान पार पडले. सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, संजय धुरी, कृष्णा चोपडेकर आदी उपस्थित होते.
मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलचे काशिनाथ नार्वेकर, दिलीप नाईक, संजय उगवेकर, पुंडलिक कुबल, नारायण लोणे, दिगंबर तांडेल, आत्माराम साळगावकर, मयुरेश तारी, प्रकाश नार्वेकर, सारिका नाईक, शिल्पा चोपडेकर, अन्विता नार्वेकर उमेदवार विजयी झाले.

