You are currently viewing महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त रंजना कदम यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त रंजना कदम यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

*महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त रंजना कदम यांचा भाजपाच्या वतीने सत्कार*

देवगड :-

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप पडेल मांडलाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त रंजना कदम इलंये देवगड यांचा सत्कार भाजपा पडेल मंडलाच्या वतीने महाळुंगे ग्रामपंचायतकार्यालय येथे उपसरपंच भक्ती घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
रंजना कदम या गेली ३५ ते ४० वर्षे विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत . त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनस्तरावर तसेच विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे . सामाजिक काम करत असताना महीलांना रोजगार उपलब्ध होऊन , महीला स्वताच्या पायावर उभ्या राहील्या पाहिजेत या उदात्त हेतुने महीला काथ्या कारखान्याची निर्मिती, काजू प्रक्रिया उधोग निर्मिती केली . रंजना कदम ह्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करत असल्याने अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून भाजप च्या वतीने सत्कार करण्यात आला . यापूर्वी त्या विविध पुरस्काराने सन्मानित आहेत ज्यात राजमाता कृषी भूषण, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा व्यसनमुक्ती कार्यासाठीचा सन्मान समावेश आहे.

♦️यावेळी महाळुंगे ग्रामपंचायत यांच्या वतीने दिला जाणारा अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार स्नेहा साटम व अदिती नवले यांना रंजना कदम यांच्या हस्ते वितरित करण्यात आला
अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या श्रीमती गीता लळीत व सौ. नंदा राणे तसेच वक्तृत्व स्पर्धेतील विजेते श्रावणी घाडीगावकर व पार्थ परब यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली
यावेळी मंडलध्यक्ष महेश बंड्या नारकर, सरपंच संदीप देवळेकर, रामकृष्ण राणे, दीपक परब, सतीश घाडी, संदीप तोरसकर, प्रकाश राणे, सुभाष नवले, संदीप राणे, सुमित राणे, सुरेश राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, रमाकांत डगरे, सुवर्णा घाडीगावकर, आकांशा राणे, रेश्मा घाडी, आत्माराम तोरसकर, रवींद्र सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा