You are currently viewing नंदकिशोर उर्फ नंदू दादा परब यांची कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निवड

नंदकिशोर उर्फ नंदू दादा परब यांची कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निवड

नंदू दादा परब मसुरे गावचे सुपुत्र…

 

मालवण :

 

भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीचे आमदार माजी मंत्री तसेच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा नुकत्याच करण्यात आल्या आहेत. यामध्ये तरुण तडफदार, कट्टर हिंदुत्ववादी, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, मसुरे गावचे डॅशिंग सुपुत्र, कार्यकर्त्यांसाठी नेहमी धावून जाणारे, गरिबांचे दैवत म्हणून ओळखले जाणारे, युवा सामाजिक नेतृत्व, श्री. नंदकिशोर उर्फ नंदू दादा घनश्याम परब यांची भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदकिशोर उर्फ नंदू दादा परब हे मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मुंबई डोंबिवली या ठिकाणी आपल्या राजकीय कार्याचा श्री गणेशा माजी मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. अनेक वर्षे सामाजिक कार्य तसेच भारतीय जनता पक्षाची विविध पदे भूषवीत पक्ष वाढीसाठी घेत असलेली मेहनत पाहून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी नंदू दादा परब यांना कल्याण भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी नुकतीच दिली. मसुरे गावच्या अनेक जडणघडणीमध्ये नंदू दादा परब यांचा मोठा वाटा आहे. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा,आरोग्य अशा सर्व क्षेत्रांमध्ये मसुरे गावासहित कल्याण डोंबिवली मध्ये नंदू दादा परब यांचे मोठे कार्य आहे.

यावेळी बोलताना नंदू दादा परब म्हणाले भारतीय जनता पक्ष तसेच सर्व वरिष्ठ नेतृत्व आणि आदरणीय माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडताना निश्चितच पक्षाला मोठा अभिमान वाटेल सर्व वरिष्ठ नेत्यांना गर्व वाटेल असं कार्य माझ्या हातून घडेल. तसेच कल्याण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी तळमळीने काम करून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षात या जिल्ह्यामध्ये सर्वत्र दिसेल.

नंदू दादा परब यांच्या निवडीबद्दल मसुरे गावामध्ये मोठे चैतन्याचे वातावरण पसरले असून सर्वत्र त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. नंदू दादा परब यांचा लवकरच त्यांच्या मसुरे गावी मसुरे ग्रामस्थांच्या वतीने एक नागरिक सत्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा