परिमल नाईकांचा आरोप; आता पर्यंत दिलेल्या लाभार्थ्यांची नावे घोषित केल्यास कळेल कोण खरे योध्ये होते
आमदार श्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करणार चौकशीची मागणी….
सावंतवाडी
कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होवून सेवा बजावणार्या सावंतवाडी पालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी व सेवाभावी स्वयंसेवक असलेल्या कोरोना योध्दयांना डावलून गरज नसलेल्या लोकांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस दिल्याचा आरोप सावंतवाडी पालिकेचे नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केला आहे.दरम्यान हा प्रकार योग्य नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त करून या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे आपल्याकडे आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.नाईक यांनी याबाबत माहीती दिली.ते म्हणाले,कोरोनाच्या काळातील ९ महीने आरोग्य सेवेसह सावंतवाडी पालिकेत काम करणार्या अनेक कर्मचार्यांनी तसेच पोलीस कर्मचारी व इतरांनी आपल्या जीवावर उदार होवून काम केले.या काळानंतर ज्या वेळी लस आली,त्यावेळी संबधित कर्मचार्यांना ही लस देण गरजेचे होते.मात्र त्या ठीकाणी आरोग्य प्रशासनाकडुन मुख्य व मूलभूत घटकांना वगळून ज्यांना गरज नाही, व ज्यांचे योगदान नाही अशा लोकांना लस दिली आहे .याबाबतचे आपल्याकडे पुरावे आहेत. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी,आणि संबधितांवर कारवाई व्हावी,अशी मागणी श्री।नाईक यांनी केली आहे.