You are currently viewing मैत्रीण

मैत्रीण

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मैत्रीण*

मैत्रीण माझी असली
जरी मूक बधीर
चेहरा तिचा बोलका
जगण्यासाठी अधीर

खाणाखुणा करते
सतत बोलत असते
माझ्या भावना कळताच
ती छान हसते

दुसरी एक मैत्रीण
पायाने अपंग
हिमतीला पक्की
मन तिचं अभंग

प्रयत्नाने सगळी कामे
स्व:ता पार पाडते
सैपाकपाणी करुन
केर कचरा काढते

तिसरी माझी मैत्रीण
ती आहे अंध
तिने छान जोपासला
गाण्याचा छंद

मोठ्या मोठ्या मैफिलीत
ती गाणी गाते
दु:खबिख्ख विसरुन
आनंदात राहते

अनुपमा जाधव, डहाणू

प्रतिक्रिया व्यक्त करा