मुंबई
कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन लोकल 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर ताळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सर्व काही ठप्प झाले होते. त्यात मुंबईची गर्दी पाहता लोकल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकलमध्ये मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने लोकल सुरु करण्याबाबत पत्र लिहले आहे.
त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची परवानगी पश्चिम रेल्वेला देण्यात आली आहे. मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. त्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव बैठक घेतली असून, यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.