You are currently viewing रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी-ॲड.अशोक जाधव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी-ॲड.अशोक जाधव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी-ॲड.अशोक जाधव

सावंतवाडी

आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -मा.नाम.रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष पदी -ॲड.अशोक गंगाराम जाधव यांची नियुक्ती पक्षाचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष-सुशांतभाई सकपाळ यांनी पत्रकाद्वारे केली असल्याने जिल्ह्यातील सावंतवाडी तालूक्याच्यावतीने नुकताच 10 वी 12 वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ॲड.जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव – रमाकांत जाधव व पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांच्या हस्ते देऊन अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका -सौ.
ज्योती रमाकांत जाधव,जिल्हा सरचिटणीस -सौ.निताली निलेश कांबळे,जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर,जिल्हा सहसचिव-सौ.प्रगती प्रकाश कांबळे तसेच जेष्ठ नेते-नारायण आरोंदेकर,तालूकाध्यक्ष-श्री.संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नाम.रामदास आठवले साहेब हे संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय नेते आहेत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते देशात नेतृत्व करत असून गावागावात पक्ष चळवळ पोहोचलेली आहे,त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील समाजघटकांना जोडण्याचे काम युवक आघाडीच्या माध्यमातून करणार असल्याचे ॲड.जाधव यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा