लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 1 जून रोजी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही रविवार 1 जून 2025 रोजी जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात 2 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 560 उमेदवार बसणार,असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांनी दिली आहे.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे KD001001 ते KD001384 आणि कणकवली कॉलेज कणकवली येथे KD002001 ते KD002176 या दोन उपकेंद्रावर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे :-
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपायोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोकाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वत:पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
