You are currently viewing ‘कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ – अतुल शेटे

‘कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ – अतुल शेटे

*’कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ – अतुल शेटे*

*अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर उपक्रम*

पिंपरी

‘कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ असा कानमंत्र संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल शेटे यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी येथे गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना दिला. ग्रंथालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे, महेंद्र बाविस्कर, नीलेश अष्टेकर, सचिन अहिरराव आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची विशेष उपस्थिती होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अतुल शेटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून अहिल्यादेवी होळकर यांच्या देदीप्यमान कारकिर्दीविषयी माहिती देऊन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीबद्दल वेगवेगळ्या टीप्स देताना, ‘आईवडील तुम्हाला मोठ्या कष्टाने पैसे पाठवीत असतात. त्याचा योग्य तो विनियोग करा, अभ्यासात सातत्य ठेवा, कष्टाशिवाय काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवून शॉर्टकट निवडू नका, यश तुमचेच आहे!’ असे प्रतिपादन केले. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतातून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा परीक्षांची आत्मविश्वासपूर्वक तयारी करता येईल, इतपत ग्रंथालय समृद्ध असल्याने त्याचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन केले. नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश घाडगे यांनी आभार मानले. याप्रसंगी स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*

संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,

संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी

या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.

वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– ⁠उच्चशिक्षित प्राध्यापक
– ⁠हवेशीर वर्गखोल्या
– ⁠परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– ⁠१००% नोकरीची हमी
– ⁠उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज

🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा