You are currently viewing शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार

एड. गजानन पुंडकर स्वागताध्यक्ष

अमरावती दि. 30 : अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट श्री गजानन पुंडकर यांची यावर्षीच्या राज्यस्तरीय आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार समारोहाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हा सत्कार समारंभ येत्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या शेगाव नाका चौकातील अभियंता भवन मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती मधील सर्व सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आय ए एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्याबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सत्कार या कार्यक्रमात संपन्न होणार आहे.

आपल्या विदर्भात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्यासाठी श्री गजानन पुंडकर यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.याशिवाय त्यांनी दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण हा उपक्रम त्यांच्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या श्री शिवाजी विद्यालयात प्रारंभ करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय अखिल भारतीय कुर्मी महासभेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षा कार्यशाळा उपक्रमात हे विविध शहरात सहभागी झालेले आहेत. त्यांची स्पर्धा परीक्षेमधील ही रुची लक्षात घेता मिशन आय ए एस च्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते त्यांचे नाव स्वागताध्यक्ष पदासाठी निवडले गेले आहे .
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी आपण स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व यावर्षी आयोजित झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून यापुढेही आपण सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी नियोजन करीत आहोत
येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये या नियोजनाची अंमलबजावणी होणार असून विदर्भातील स्पर्धा परीक्षेची टक्केवारी वाढावी हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे.
डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार घडवून आणते. आतापर्यंत या उपक्रमांमध्ये जवळपास 373 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहे. एखाद्या संस्थेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी सहभागी होणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेमध्ये फक्त एक रुपया मध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येतात. हा उपक्रम महाराष्ट्रात 24 जिल्हा सुरू असून सर्व जिल्ह्यातून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहे

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येत्या शुक्रवार दि. 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन याप्रसंगी स्वागताध्यक्ष या नात्याने एडवोकेट गजानन पुंडकर यांनी केले आहे.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा