You are currently viewing म ला फ स वि ले

म ला फ स वि ले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*म ला फ स वि ले*

 

वळूसारख्या मारून धडका

अवकाळी तो दमला आज

घेऊन दमाने मागे *माफी*

आत यायला वाटे *लाज*….1

काचेवरती मारून *लाथा*

किती सतावे अभ्यास करता

पश्चा:तापाची जाणीव होता

हाका मारून *दमला* आता…2

येऊन काकुळतीला म्हणे कसा

*क्षमा* मागतो मी सर्वांची

बिले फाडून नावावर माझ्या

सोय करती *मलीदा* खायची…3

गृहीत धरून मला चालती

*गाळ* टाकती काठावरती

म्हणून देतो *दणका* दरवर्षी

खापर फोडती माझ्यावरती…..4

लिहून पुस्तके घ्याल पीएचडी

वाचवून आपली जाड चामडी

नेमून समित्या सत्य शोधायच्या

*जनधनाची* करून नासाडी….5

करा *किलकिले* दार जरा

आत येऊन म्हणे, चहा पितो

शपथ घेऊन *नावे* सांगतो

कोण पैशावर *हात* मारतो….6

ठेवून भरवसा *पावसावरती*

दुपार म्हणुन *दार उघडले*

समोर पहातो तो *मोठे तळे*

स्वप्नात येऊन *मला फसविले*..7

 

विनायक जोशी 🖋️ठाणै

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा