You are currently viewing मोती तलावातील ‘म्युझिकल फाऊंटन’ लवकरच होणार सुरू – आ. दीपक केसरकर 

मोती तलावातील ‘म्युझिकल फाऊंटन’ लवकरच होणार सुरू – आ. दीपक केसरकर 

मोती तलावातील ‘म्युझिकल फाऊंटन’ लवकरच होणार सुरू – आ. दीपक केसरकर

सावंतवाडी:

ऐतिहासिक मोती तलावात उभारण्यात आलेला ‘म्युझिकल फाऊंटन’ (संगीत कारंजा) लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी या संगीत कारंज्याची पाहणी करत त्याच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेतला. सावंतवाडी शहर येत्या काळात पर्यटन क्षेत्रातील एक प्रमुख आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेचार कोटी रुपये खर्चून हा संगीत कारंजा उभारण्यात आला असून, सध्या त्याच्या चाचण्या (ट्रायल्स) सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा कारंजा लवकरच सुरू करण्यात येईल. सावंतवाडीला पर्यटनाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असून, मोती तलाव हा त्याचा मुख्य आकर्षण बिंदू असेल.

या प्रकल्पासोबतच मोती तलावात बोटींग, तलावकाठी खाऊगल्ली आणि योगा सेंटरसारखे अन्य प्रकल्पही सुरू होणार आहेत. याव्यतिरिक्त, सावंतवाडीत ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क आणि शिल्पग्राम यांसारखी अनेक पर्यटनस्थळे आधीपासूनच उपलब्ध आहेत. या सर्व घटकांमुळे सावंतवाडी शहर येत्या काळात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करेल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रसाद महाले, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर, शैलैश मेस्त्री, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा