You are currently viewing गुलाबस्तवन…!!

गुलाबस्तवन…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन..!!*

 

धरेला बिलगून अंगणात

मृदमधुर तेजात उतरलास

ह्दय थिरकलं वारियात

आनंदून अंतरी विसावलास..!

 

राजस मनभोर छबी

रंग लावण्य साजरे

रूप कायेत उतरले

उतावीळ अनुरक्त लाजरे..!

 

नभातून ओलावा झिरपला

अद्वैत सृजनाची… माया

आरस्पानी ओघळं लगडलं

प्रेमरंगाने… व्यापली काया..!

 

क्षणसारे भाग्याचे रूजले

मन माझे …झुलले

ईश्वर वाटेवर उभा….कधीचा

अंतरंग गाभा-याचे झुळझुळले ..!

 

ईश्वरासोबत निघून जाणं

मला..तुझं…मान्य नाही

गाभा-यात आसनस्थ मधुमास

माती..सहन करणार नाही..!

 

माझ्या मातीशी गद्दारी..

मी..करू देणार नाही…!!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा