You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०० वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- १०० वे

अध्याय – १७ वा , कविता – ४ थी ।।

___________________________

श्री गजाननाच्या बोलण्यावर । जठार करिती विचार ।

स्वामींचे मुक्त-जीवन नि विचार । शिष्य त्यांचे देत नाहीत नीट लक्ष स्वामींकडे ।। १ ।

 

भास्कर शिष्याने लक्ष नाही दिले । म्हणून हे सारे घडले ।

जबाबदार भास्करास धरले । जठार साहेबांनी ।। २।।

 

दंड ठोठावला भास्कराला । स्वामी म्हणाले मग त्याला ।

अतिआग्रह तुला नडला । नको वागू असे यापुढे ।। ३ ।।

 

एकदा असेच स्वामी अकोल्याला आले । बापुराव शिष्याच्या

घरी उतरले । बापूरावाने माणुस पाठवून कळवलें ।

महताबशा साधूला ।। ४ ।।

 

मिरवणूक निघाली। छान मिरवून आली। भोजनास यावे

स्वामी ,विनंती केली । बापूरावाने ।। ५ । ।

 

साधुस नाही बोलावले । म्हणून स्वामी भोजना ना आले।

शेवटी साधुलाही बोलावले । स्वामींच्या सोबत भोजनास ।।६।।

 

स्वामींना राममंदिरी उतरवले। मेहताब साधूला जवळील

थेटरात पाठवले । शेवटी स्वामी ही तिकडेच गेले। साधुस

भेटण्याला ।। ७।।

*****************

करी क्रमशः हे लेखन कवी- अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा