You are currently viewing एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत सन 2025-26 अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन व पणन सुविधा व प्रक्रियांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज सादर करण्याचे, आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

             राज्याच्या कृषि उत्पादनात फलोत्पादन पिकांचा महत्वाचा वाटा आहे. फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया करुन शीतगृहांमध्ये साठवणूक करुन फलोत्पादन पिके, त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम, पणन सुविधा व प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये फार्म गेट पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, संकलन एकत्रीकरण केंद्र, पुर्व शीतकरण गृह, फिरते पुर्व- शीतकरण गृह, शीतखोली, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, पुसा झिरो एनर्जी कुल चेंबर, सोलर क्रॉप ड्रायर, एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प, एकात्मिक पुरवठा साखळी प्रकल्प, अपनी मंडी, ग्रामीण बाजार, थेट बाजार, वातावरणी नियंत्रित रिटेल बाजार, विक्री दालन, स्थायी, फिरते विक्री केंद्र, सुधारित रिटेल रेफर व्हॅन रिटेल काऊंटरसह, मूल्यवर्धनासाठी दुय्यम अन्न प्रक्रिया युनिट या घटकांकरिता लाभ दिला आहे.

            अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा