You are currently viewing ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने २०२५ चे पुरस्कार

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने २०२५ चे पुरस्कार

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने २०२५ चे पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांना ‘जीवन गौरव’ तर दयानंद मांगले पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

कणकवली

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (AJFC) यांच्या वतीने २०२५ साठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांना ‘जीवन गौरव’ तर दयानंद मांगले यांना पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.येत्या ७ जून रोजी पनवेल येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

AJFC च्या निवड समितीचे पदाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली, असे निवड समिती प्रमुख अतुल होनकळसे यांनी सांगितले.

पुरस्कार विजेत्यांची नावे;

जीवन गौरव पुरस्कार: श्री. शैलेंद्र शिर्के, संपादक, दैनिक पुण्यनगरी, नवी मुंबई.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार: . किशोर आबीटकर, गारगोटी.

दैनिक सागर संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार:. वैभव पाटील, दैनिक पुढारी, सातारा.

मूकनायक वर्तमानपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार: . दत्तात्रय उकिरडे, अहिल्यानगर, दैनिक सकाळ.

साप्ताहिक ससेमिरा संपादक मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार: दीपक घोसाळकर, नवी मुंबई, दैनिक पुढारी.

भंडारी समाज नेते स्व. शरददादा बोरकर ग्रामीण कार्यकर्ता राज्य प्रेरणा पुरस्कार: संतोष ढोरे, पनवेल, वृद्धाश्रम सेवा.

कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार: श्री. सुनील आटपाडकर, सामाजिक विकास अधिकारी, एमएमआरडीए प्राधिकरण, मुंबई.

दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार: बजरंग सोनवणे, मुंबई.

वरिष्ठ पत्रकार नवीन सोष्टे स्मृती विभागीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार: निलेश नवघरे, अकोट तालुका, दैनिक तरुण भारत.

मधु रावकर पत्रकार प्रेरणा पुरस्कार: दयानंद मांगले, देवगड.दै रत्नागिरी टाइम्स प्रतिनिधी

जयानंद मठकर स्मृती विभागीय मराठी पत्रकार पुरस्कार: प्रकाश वळंजू, राजापूर यांची निवड झाली आहे असे निवड समिती प्रमुख श्री अतुल होनकळसे जाहीर केले.

या पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा