*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जयंती निमित्त अभिवादन!”*
स्वातंत्र्यवीर कल्पनांचा महासागर
स्वराज्य सुराज्य संकल्पनांचा अविष्कारIIधृII
ठिणगी नव्हे नुसती होते प्रज्वलित अग्नी
तादात्म्य होते एक रूप मन कर्मवचनी
व्यक्तित्व कृतित्व वक्तृत्व कवी कर्मवीरII1II
तप तत्व त्याग तेज तळपे सतत
क्रांतीच्या आवेगात होते चांदणे कवितेत
तितिक्षु जहाल हळवे होते सावरकरII2II
क्रांती भक्ती असाध्यत्व होते कुटुंबात
उद्वेग आवेग संवेग होते सम्मिलित
विरत्व कवित्व चंद्राशी गुज अलवारII3II
समाज सुधारक विद्वान टाळती भेदाभेद
मराठी भाषाप्रभू इंग्रजीला देती प्रतिशब्द
पुरोगामी विचारवंत इतिहासकारII4II
भूवरी पाय रोवून उंच भरारी घेत
आकाशी विहरताना धरित क्रांती ज्योत
दुष्प्रवृत्ती विरुद्ध लढती सावरकरII5II
मंत्र दिला सर्वांना तुजसाठी मरण जनन
स्वातंत्र्यार्थ चिंता वाहून केले मार्गदर्शन
त्यजिली पदे देह भारत माँ चरणावरII6II
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
