*ज्येष्ठ साहित्यिका कविता सौ.किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
स्वातंत्र्यवीर सावरकर
शतकाहूनी अधिक काळ
ब्रिटिश राजवटीत होरपळला
मिळावे स्वातंत्र्य म्हणून
क्रांतिकारांनी बंड पुकारला
असीम प्रेम मातृभूमीवर
सर्वस्वाचा होम करुनी
अभिनव भारत संघटना
स्वातंत्र्यासाठी स्थापूनी
गरजले नी ते बरसले
ब्रिटिशकालीन भारतात
एकमेव ध्येय बाळगले
देश न राहो पारतंत्र्यात
हरहून्नरी सावरकर होते
वर्ण कराया शब्दच कमी
हिंदुत्व संकल्पना प्रणेते
संकट वादळातही संयमी
कैक जुलूम साहले त्यांनी
अंदमान काळकोठडीमध्ये
प्रबल इच्छाशक्तीचे राहिली
नेहमीच वीर सावरकरांमध्ये
सावरकरांच्या शब्दात होता
सदाच स्वातंत्र्याचा अंगार
तीथेच प्रकाशमान होता
सावरकर नावाचा विचार
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

