*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे माननीय सदस्य विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बसतील पाठीत रट्टे भरपूर*
क्रूर किती हा मानव प्राणी
उजाड करतोय सारी धरणी
स्वार्थापोटी करे *अविचार*
नाही मिळणार पिण्या पाणी
//1//
आडवे येताच *पिंपळ वड*
तोडून टाकतोय *धडाधड*
देऊन अश्वासन पुनर्रोपणाचे
होतेय कुठे त्यांची *लागवड*
//2//
पर्यावरण वेडे उगाच खपती
किती उभारती *संघटना*
सरकार त्यांचा सत्कार करते
मिली भगत, *यांना रोखेना*
//3//
नाटक करून *लुटू पूटुचे*
वाटेला लावती *अडथळे*
पहिले पाढे पंचावन्न म्हणून
जागा अडवून बांधती पुतळे
//4//
देऊन ठेवतोय इशारा आज
बरा नाही हो असला *माज*
नाही मिळणार जेव्हा प्राणवायू
जनता बांधेल यांचा *ताज*
//5//
नाहीत दिवस ते *दूर* आता
जाईल नाकात यांचे *धूर*
नाही येणार ठणठण बंब आगीचा
बसतील पाठीत रट्टे *भरपूर*
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
मंगळवार 2 7 *मे* 2 0 2 5
