You are currently viewing सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य 

सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य

सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य

साफसफाई न झाल्यास मनसे स्टाईलने एसटी बस स्थानकावर मोर्चा काढणार

सावंतवाडी
येथील बस स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने ग्रासलेला असून, एसटी डेपो याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केला आहे. बस स्टँड मागील बाजूस खाद्यपदार्थ विकले जात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे ग्राहक व दुकानदार त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही एसटी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसून येत्या दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करू, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, येथील बस स्टँड परिसरातील कर्मचाऱ्यांच्या पार्किंगच्या जागेचा वापर मद्यपानासाठी केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. एसटी प्रशासनाच्या या दुर्लक्षित करत आहे. याबाबत सावंतवाडी बस आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे तातडीने या परिसरातील कचरा हटवून, मोठ्या प्रमाणात वाढलेली व विद्युत वाहिनींना स्पर्श करत असलेली झाडे तात्काळ तोडण्याची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत जर बस स्टँड परिसराची साफसफाई न झाल्यास, मनसे स्टाईलने सावंतवाडी एसटी बस स्थानकावर मोर्चा काढण्याचा इशारा केतन सावंत यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा