नेत्रदान करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सन 2024-25 मध्ये 5 व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केलेले आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा 1 मे 2025 रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच नेत्रदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन नेत्रदान करण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.
नेत्रदान हे दृष्टिहीनांच्या जीवनात दिवा लावण्यासारखे आहे. तुमचे डोळे दान केल्याने इतर कोणाला तुमच्या डोळ्यांव्दारे जग पाहण्याची संधी मिळते, जगाचे सौंदर्य आणि आश्चर्य वाटुन घेता येते. आपले डोळे दान केल्याने अंध व्यक्तीला उज्वल भविष्याची आशा मिळते, ज्यांची दृष्टी गेली आहे, त्यांना नेत्रदान ही दुसरी संधी देते. नेत्रदानाचा संकल्प फॉर्म आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याकडे भरुन देऊन नेत्रदानाचा संकल्प करु शकता. अधिक माहितीसाठी नेत्रसमुपदेशक रोहन शारबिद्रे मोबा. 9665742322 यांच्याशी संपर्क साधावा.

