*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कन्या*
कन्या माझी लाडाची
कैरी जशी पाडाची
आंब्यासारखी आहे गोड
तिची मला सारखी ओढ
हिंडते फिरते सारखी खेळते
शाळेला पळते
झऱ्यासारखी
झुळझुळते
जिद्द आहे तिला
स्वप्नापर्यंत भिडायची
आभाळात पक्ष्यासारखं
उंच उंच उडायची
अनुपमा जाधव, डहाणू

