के.एल.पोंदा. हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका, ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्त्या ताईसाहेब अनुपमा जाधव मॅडम यांना मनापासून हार्दिक अभिनंदन!
उन्हाळी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी दररोज कविता प्रकाशित करून वाचन-लेखनाची आवड निर्माण करण्यात, पर्यावरण जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविण्यात आपले असलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. मराठी आणि अहिराणी भाषेतील आपल्या कवितांनी विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक प्रभाव पाडत आहे.
अत्यंत मनमोहक आणि प्रभावी कविता “कवितेचं पीक” बद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या कवितेतुन जीवनातील विचार, अनुभव आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ इतक्या सुस्पष्टतेने व्यक्त केल्याबद्दल मनापासून कौतुक वाटते. तुमच्या शब्दांनी जणू स्वप्नांना पंख लागले आहेत आणि वाचकांच्या अंतरंगात प्रेम, आशा आणि सृजनशीलतेचा उजेड पसरविला आहे.
अशा प्रतिभावंत लेखनासाठी तुम्हाला पुढील लेखन प्रवासासाठी माझ्या अंतःकरणातून मनःपूर्वक शुभेच्छा!
सर्जनशीलतेचा हा प्रवाह अखंड व महत्त्वपूर्ण राहो!
आपल्या या नवनवीन उपक्रमास यश मिळो, विद्यार्थ्यांची लेखनशक्ती आणि सर्जनशीलता अधिक वाढो, आणि आपला साहित्यप्रेम अजून दीर्घकाळ टिकून राहो, ही सदिच्छा!
आपल्या पुढील सर्व वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
🌹📚✨
शुभेच्छुक
श्री ईश्वर आर महाजन
मुख्य संपादक
मराठी लाईव्ह न्युज
अमळनेर तालुका प्रतिनिधी
दैनिक शब्दगंगा
उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य
निवास- 24 अ, विद्याविहार कॉलनी अमळनेर जिल्हा जळगाव
9860352960
9766939950
