You are currently viewing माणूस नावाच बुजगावण

माणूस नावाच बुजगावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माणूस नावाच बुजगावण* 

***********************

कधी कधी काय होतं की

खूप वैताग येतो

मन कशातच लागत नाही

अशावेळी दुर कुठेतरी

एकांतात जाऊन बसायचं

अणि स्वतःलाच विचारायचं

 

खरंतर उत्तर मिळत नाही

विचार चक्र थांबत नाही

आयुष्य असच असतं आडवळणी

खाचखळग्यांनी भरलेलं

कुठेतरी सरलेलं

 

नेहमीच असं का होतं अस्वस्थ

स्थिरस्थावरता कुठेच नसते रे

बस दिवस उजाडला की

या वितभर पोटासाठी पळत रहायचं

पावलांना माहिती नसतं

कधी कुठे केंव्हा थांबायचं

 

वाटा खूप असतात

प्रत्येक वाटेवर वळणं दिसतात

काटे असले तरी चालायचं असतं

कितीही गहिवरून आलं तरी

थांबायचं नसतं

खरतर जखमा खोल असल्या तरी

त्या बोलतं नसतात

कारण आपली भूक मारून

त्यांच्या भुकेसाठी

आपणच निर्माण केलेली वारसदार

पोसायची असतात

 

कोण विचार करतं

कपाळावरचा घाम कोणी पुसत नसतं

वेदना यातना अपमान शिव्याशापाचं

ओझं घेऊन फिरायच

आणि उसन हसू चेहऱ्यावर आणायचं

कितीही मरमर केली कितीही कमवले तरी

उंबरठ्याच्या आत आणि उंबरठ्याच्या बाहेर

माणसाचं काहीच अस्तित्व नसतं

हयातभर संघर्ष आणि पायपीट करीत

कसतरी जगणं संपवायचं असतं

 

एकांतात बसल्यावर कळत मात्र

दुसऱ्यांसाठी झिजलो यार

पण स्वतःसाठी जगलोच नाही

आणि काय कसं जगलो

कोणालाही दिसत नाही

गर्दी कितीही असली अवतीभोवती तरी

आयुष्याच्या अखेर फक्त प्रश्नचिन्हच दिसतो

कष्टाच कधी मोजमाप होत नसलं तरी

माणूस नावाच बुजगावण

मात्र एकटाच दिसतो.

 

 

*संजय धनगव्हाळ*

*अर्थात कुसुमाई*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा